मृतांमध्ये एक परदेशी पहलगाममधील हल्ला   

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन नव्हे तर एका परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तो नागरिक नेपाळचा होता, असेही अधिकार्‍यांनी सांगितले. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी लष्करी वेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. मृतांमध्ये दोन परदेशी आणि दोन स्थानिकांचा समावेश असल्याचे वृत्त होते. बुधवारी रात्री सरकारने प्रथमच मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केला. या हल्ल्यात एक परदेशी नागरिक मारला गेला. तो नेपाळचा होता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले. 

Related Articles